Translate

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

छत्रपती राजाराम महाराज.



   छत्रपति राजाराम महाराज

जन्म: २४ फेब्रुवारी १६७० मृत्यू : १७००
छत्रपति राजाराम महाराज
स्वराज्याचे तिसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र छत्रपती राजाराम महाराज. २४ फेब्रुवारी १६७० फाल्गुन पौर्णिमेस सोयराबाई राणी सरकार प्रसूत जाहल्या,पुत्र जाहला.'राजाराम' नाव ठेविले. याची नोंद जेधे शकावली मध्ये पहावयास मिळते.
"....शके १५९१ ,फाल्गुन शुद्ध १५ राजगडी राजाराम उपजले " जन्मताना ते पायाकडुन जन्मले म्हणुन सर्वजन चिंतीत झाले असता शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तवीले (ही कथा) आणि जरी राजाराम महाराजांनी पातशाही पालथी घातली नाही तरी त्याने पातशाहाला मात्र झुंजवत ठेवुन यश मिळु दिले नाही, पातशाही खिळखिळी केली. राजाराम महाराजांना लिहीता वाचता येत होते. राजाराम हे शांत धीरगंभीर प्रकृतीचे होते . राजाराम महाराजांचे लष्करी शिक्षन हे सरसेनापती हंबीरराव मोहीत्यांकडे ( स्वराज्याचे सरसेनापती व नात्याने सख्खे मामा) झाले.
हबिंरराव हे कुडतोजी (प्रतापराव) गुजरानंतरचे सेनापती. प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामाचे लग्न लावले.

छत्रपती राजाराम हे मूळात शांत स्वभावाचे माणूस होते. त्यांनी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालन्याचा प्रयत्न केला व त्यात ते बर्यापैकी यशस्वी झाले . व्यक्तीगत रित्या ते गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होते . आक्रस्ताळेपणा त्यांच्या अंगी न्हवता. धाडसी मनोवृत्तीचे होते पण त्यांनी एका पत्रात दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली. काळ पाहीला तर औरंगजेब दक्षिन गिळंकृत करत होता, पैसे न्हवते, पुरेसे सैन्य न्हवते आणि महाराज दिल्लीला घशात घालण्याचे स्वप्न पाहत होते . काय म्हणावे ह्या धैर्याला. बेडर वृत्ती, धाडसीपणा की आणखी काही. हे गुण त्यांना वडिलांकडुन आले. ऐवढेच नाहीतर वडिलांसारखी त्यांनी सुरतेला तिसरेंदा हल्ला चढविन्याची तयारी केली होती पण ऐनवेळी बातमी फुटल्यामुळे त्यांना मोगली सैन्याशी महाराष्ट्रातच मुकाबला द्यावा लागला व ते झाले नाही. राजाराम महाराज महाराष्टात परत १६९८ मध्ये आले. त्यांनी आल्याबरोबर आपल्या पवित्रा बदलला. आजपर्यंत ज्या लढाया झाल्या होत्या त्या बचावासाठी. नंतर ज्या झाल्या त्या आक्रमण करन्यासाठी. मोगली सैन्य मराठ्यांच्या प्रतिकारापुढे जास्त असुनही टिकत नव्हते कारण त्यांचा राजा हाल सोसुन त्यांना लढन्यास भरीस पाडत होता. स्व:त स्वार्यावर जात नव्हता.

औरंगजेबाने त्याचा युध्दनितीत १६९८ ला परत बदल करुन मोठी चढाई केली त्याला घाबरुन जाऊन परत एकदा जिंजीला जाण्याबद्दल बोलने चालले पण त्या बोलन्यास राजाराम महाराजांनी नकार दिला व त्यांनी स्वतः अनेक स्वार्या चालु केल्या गदग, वर्हा्ड येथे जाउन संपती लुटून आणली. महाराज परत एकदा कर्नाटकात गेल्याचा उल्लेख आहे पण त्या स्वारी बद्दल जास्त माहीती नाही. संताजी व धनाजी असे दोन थोर सेनापती त्यांना लाभले. भरताने जसे रामाचे राज्य स्विकारले तसे राजाराम महाराज यांनी शाहु महाराज यांचे राज्य स्विकारले. त्यांना छत्रपतीपदाचा मोह नव्हता. कित्येक कागदपत्रात हे दिसुन येईल की ते बरेचदा राज्य थोरल्या भावाचे आहे व मी फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे सरदारांना लिहीत असे . असा थोर राजा महाराष्ट्राला लाभला हे आपले भाग्य. त्यांनी नविन राष्ट्र उदयास आणले ही त्यांची कामगीरी.

राजाराम महाराज जिंजीस असताना ज्यांना सनदा दिल्या त्यावर 'धर्मप्रद्योदिताशेष' हि मुद्रा होती .पूर्वी दिलेल्या सनदांचा फेरविचार करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यावर 'प्रतिपत' अनुकरणाची मुद्रा उठवणे आवश्यक झाले, त्यानंतर दोन महिन्यांनी राजाराम महाराजांचे निधन झाले ,त्यावरुन 'प्रतिपत' मुद्रा शेवटी केली असे दिसण येते. या दोन्ही मुद्रांचा आकार वाटोळा आहे.राजाराम महाराज यांची तिसरी मुद्रा देखील असून ती 'श्री राजाराम छत्रपती ' एवढीच असून चौकोनी आहे .ती राजचिन्हे धारण करण्यापूर्वीची असावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा