हिरोजी इंदलकर
हिरोजी इंदलकर नावाचे बांधकाम प्रमुख महाराजांकडे होता रायगड सारखा किल्ला बांधण्याची जवाबदारी शिवरायांनी त्यांच्यावर सोपवून महाराज स्वारीवर गेले. हिरोजींनी रायगड निम्या पर्यंत बांधत आणला.आणि पैसा संपला हिरोजीला कळेना काय करावं. शिवरायानी जवाबदारी तर टाकलीये किल्ला तर बांधला पाहिजे पैसा तर शिल्लक नाही.
ह्या हिरोजींनी अपूर्ण काम केले. आपला राहता वाडा आपली सगळी जमीन विकली बायकोला घेऊन रायगडला आला पैशासह झोपडी बांधून राहिला राहू लागले.आणि मराठ्यांची राजधानी बांधून काढली .
शिवरायांना आल्यावर कळलं हिरोजीने काय केले...? राज्याभिषेकाच्यावेळी शिवाजींना वाटलं ह्या हिरोजिंचा सत्कार करावा.राज्याभिषेकाच्यावेळी शिवाजी म्हणाले हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात बोला तुम्हाला काय हवयं....?
त्यावेळी हिरोजींनी मान झुकवून म्हणाला महाराज उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरांत टाकलाय आम्हाला आणिखी काय हवयं महाराज म्हणाले नाही हिरोजी आहो तुम्ही काही तरी मागितले पाहिजे त्यावेळी हिरोजी म्हणाले महाराज एक विनंती आहे या रायगडावर आम्ही जगदीश्वराचे मंदिर बांधलय त्या मंदिराच्या एका पायरीवर आमचे नाव कोरण्याची अनुमती हवी आहे.
हिरोजी यावर सांगतायत राजे जेव्हा रायगडावर असाल तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल जेव्हा जेव्हा दर्शनाला याल तेव्हा तुमची पाउले त्या पायऱ्यावर पडतील आणि महाराज त्यातल्याच एका पायरीवर जर माझे नाव असेल तर तुमची पायधूळ सतत माझ्या नावावर म्हणजेच माझ्या मस्तकावर अभिषेक करत राहील रे एवढे भाग्य फक्त पदरात टाका कि तुमच्या पाउलांची पायधूळ सतत माझ्या मस्तकावर अभिषेक करत राहू देत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा