पूर्ण नाव :छत्रपती संभाजी शिवाजीराजे भोसले.
जन्म :१४ मे,इ.स.१६५७,पुरंदर किल्ला,पुणे जिल्हा,महाराष्ट्र
मृत्यू :११ मार्च,इ.स.१६८९,तुळापूर,महाराष्ट्र समाधी वढू,महाराष्ट्र
वडील :शिवाजीराजे भोसले
आई :सईबाई
पत्नी :येसूबाई
राजब्रीदवाक्य: श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा धौरीव राजते, यंदकसेविनी लेखवर्तते कस्य नोपरी
चलन: होन,शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन)
राज्याभिषेक: जानेवारी,इ.स.१६८१.
राज्यव्याप्ती:
पश्चिम महाराष्ट्र,कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र,खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
माहिती -
हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.
अधिकारकाळ- जानेवारी, इ.स. १६८१ - मार्च ११, इ.स. १६८९
शिवपुत्र संभाजी
छत्रपति शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करणारे छत्रपति संभाजी. महाराष्ट्राचे पाहिले युवराज आणि या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपति. शिवाजी महाराजांसाराखेच प्रचंड पराक्रमी आणि चारित्र्यवान होते. संभाजीराजांच्या आईचे,सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजीचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई,सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.
राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा