महाराणी सईबाई शिवाजीराजे भोसले
जन्म: तारीख उपलब्ध नाही - मृत्यू :- ५ सप्टेंबर १६५९.
महाराणी सईबाई शिवाजीराजे भोसले (निंबाळकर)
छत्रपती शिवरायांच्या सर्वात प्रिय पहिल्या पत्नी. छत्रपती आणि रणधुरंधर संभाजी राजांच्या मातोश्री. जिजाऊ मातोश्रींची सर्वात प्रिय व संस्कार प्रियसून .
सईबाईंचे वडील मुधोजीराव नाईक निंबाळकर होते. छत्रपती शिवरायांबरोबर सईबाईंचा विवाह झाला. तेंव्हा त्या फक्त ७ वर्ष्याचा होत्या आणि शिवराय अंदाजे १०-११ वर्ष्यांचे होते. रंगाने गव्हाळ, शांत आणि सोज्वळ अश्या सईबाई....
त्या शिवरायांच्या नुसत्या पत्नी नसून सहचारिणी आणि स्फूर्तीस्थान सुद्धा होत्या, एका सामर्थ्यवान पराक्रमी पुरुषाची पत्नी होणे हि सुद्धा तेवढीच अशक्य आणि त्रासदायक गोष्ट असते.... परंतु त्या अश्याच सामर्थ्यवान पत्नी होत्या.... शिवरायांच्या सर्वात प्रिय पत्नीची आढळ जागा त्या ह्यामुळेच मिळवू शकल्या...
शिवराय आणि सईबाई ह्या दांपत्याला, एकूण चार मुले झाली. पैकी ३ मुली आणि १ मुलगा असे होय. मुलीमध्ये - सखुबाई (निंबाळकर), राणूबाई (शिर्के), अंबिकाबाई (महाडिक) ह्या होत्या तर शंभूराजे (संभाजी महाराज) हे सर्वात लहान सुपुत्र होते. सईबाई या छत्रपती संभाजी राजांच्या आई होत्या. परंतु शंभूराजे लहान असतानाच सईबाईंचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्युनंतर शिवरायांना त्यांची भरपूर उणीव भासली. शंभूराजांना पाहताना शिवरायांना कायम सईबाईंची आभासमूर्ती नजरेसमोर उभी राहत असे. सईबाईंच्या मृत्यूने संभाजी राजेच पोरके झाले नाहीत तर शिवराय सुद्धा मनाने एकटे झाले होते.
सईबाई आणि शिवराय यांची मुलगी सखुबाई यांचा विवाह सईबाईंचा भाऊ बजाजी नाईक निंबाळकर याच्या मुलाशी झाला.
संभाजींचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती, शंभूराजे २ वर्ष्यांचे असतानाच आपल्या मातोश्रीनपासून दुरावले होते. पुढे शंभूराजांना त्यांच्या आज्जी व शिरायांच्या मातोश्री " जिजाउंनी " घडवले.
मृत्यू समयी शिवरायांच्या तोंडून शेवटचा शब्द "सई" निघाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा