..........// रामभरोसे \\…………
जीवन ईथले "रामभरोसे" चेहरा ईथल्या लोकशाहिचा |
निरोप मज देता हिरमुसतो का चेहरा माझ्या आईचा ? || ध्रू. ||
करूनी चाल लाटांवर मृत्यु दडवून चाहुल दबकत आला |
आधुनिक शस्त्रांनी विकसनशील देशाला बडवून गेला |
मानवतेला चिरडून चेहरा हसला आतंकी पशूतेचा ! निरोप .... || 1 ||
वीरमरण जणू अधिकार्यांचे व्यवस्थेतल्या चिंधड्या दावून |
त्याच व्यवस्थेवरी विसंबुन आशा ऊठली जरी सावरून |
जीवनास आत्ता किंमत्त का ? प्रश्न हाच होता आशेचा ! निरोप ... || 2 ||
जैसे थे परी सुरक्षाच ती तशीच हतबल आधीसारखी |
ऊडदामाजी काळे कळण्या नजर हवी परी रत्नपारखी |
प्रवेशद्वाराविना स्थानके जणू मार्ग ऊघडा चोरांचा | निरोप ... || 3 ||
ऊद्गमदात्या अवैध वस्त्या जरी अनैतिक त्या धंद्यांच्या |
रूंदावत होत्या शहरांतुन गिळूनी पट्ट्या भुखंडांच्या |
पाणी - घरपट्ट्या भरूनीहि नागरिक दबुनी देशाचा | निरोप ... || 4 ||
सरकारी दाखले मिळवण्या सुरूच खेटे सामान्यांचे |
त्याच दाखल्यांच्या परी हृद्यी जणू प्रेम अवैध वस्त्यांचे |
प्रश्न मनी मग सुरक्षेस का " अजुनहि " चिरडून भार मतांचा ? निरोप ... || 5 ||
होती खिदळत विकृतीच ती करूनी हत्या माणूसकीची |
वर्षे सरली कारण तिजसाठी खर्चत माया कोटिंची |
सुरक्षित " विकृती " ईथे जणू संदेशच "अपुल्या" वृत्तीचा | निरोप ... || 6 ||
खोट्या पोकळ व्यवस्थेस ह्या बसून पुन्हा आतंकी दणका |
पडून बळी दुसर्या शहरांतुन ऊडून तिथे स्फोटांचा भडका |
कुंभकर्णी झोपेतुन जाहला घात पुन्हा मग मुंबापुरीचा | निरोप ... || 7 ||
ओढ घरांची पावलांस ज्या शंका नव्हती किंचित त्यांना |
त्यांच्या निष्पापी रक्ताची आतंकी हृद्यास वासना |
मग पाशवी त्या स्फोटांनी श्वास ऊखडला मानवतेचा | निरोप ... || 8 ||
प्रत्येकाच्या हृद्यस्थाला धरले हृद्यी ज्या शहराने |
शहरावर त्या पाहून हमला देश गलबलून आघाताने |
भ्रमणध्वनींचे जाळे हतबल भार झेलण्या ह्या चिंतेचा | निरोप ... || 9 ||
क्षेमकुशल कळण्या स्वकियांचे मग डोळ्यांतुन प्राण दाटले |
वृत्तवाहिन्यांवरी विसंबुन विश्वासाने असता सगळे |
वृत्तवाहिन्या काहि गेल्या श्वास कोंडूनी विश्वासाचा |
निरोप ... || 10 ||
किंवा योग्य हे असेल कारण नियम आगळे ह्या देशाचे |
बळी पाहूनी स्वरूप ठरते सदैव जिथल्या आघाताचे |
स्फोट घडविणे अफवेमधुनी असेल धक्का कुणा यशाचा | निरोप ... || 11 ||
परी स्फोटाने युध्दभुमीची दाहकता पोळून शहराला |
रक्ताच्या थारोळी अवयव कुठे हरवूनी ह्या देहाला |
विधात्यास मग प्रश्न चुकुन का " मी निर्माता सैतानाचा ? " निरोप ... || 12 ||
ईतरांना सावरता दिसली परी मानवता जख्मी होऊन |
ऊपचाराआधी मृत्युची झुंजच निर्जीव कोठे विव्हळून |
हरूनी रूग्णालयात कोणी "जन्म पोरक्या परिवारांचा" ! निरोप ...|| 13 ||
हात पोरका फटित मिळूनी काळरात्रीच्या दुसर्या दिवशी |
पिळवटणार्या प्रश्नांच्या त्या हृद्यावर कोसळल्या राशी |
धडपडेल का बाळच कुठले हात न दिसूनी तो मायेचा ? निरोप ... || 14 ||
लेक लाडकी होरपळून का हाताच्या प्रेमळ छत्राविण ?
माय - बाप कोसळतील थकूनी कुठे एकल्या त्या काठीवीण ?
एकच ऊत्तर दिसले हतबल "तिथे हात जो सामान्याचा" | निरोप ... || 15 ||
राजकारण्यांना देशातील जो जिवलग मतदानापुरता |
त्या हाताच्या रेषांवर जो मृत्यु का मग त्याच्यापुरता ?
येतो ?........ येतो म्हणता जिभ धडपडे निरोप घेताना घरच्यांचा |
निरोप मज देता हिरमुसतो का चेहरा माझ्या आईचा ? || 16 ||
- मकरंद सुधाकर पाटोळे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा