जीवन
भवतालीचे चटके शोषुन "जीवनातली" शक्ती फुलते |
खळखळूनी अपुल्यातुन मग हे "कलेगरागत" कसे गोठते ?||ध्रू.||
संवेदनाच ह्याच्यामधुनी सळसळूनी अवघ्या विश्वातुन |
अस्तित्वहि नसते सृष्टीचे ज्याच्या शीतल स्पर्शावाचुन |
बाष्परूपे गिळूनी चटके ते तृष्णेच्या वणव्यास विझवते | खळखळूनी...|| 1 ||
बाष्पामधली ऊर्जा दिसते "शीतल" अन वाफेतील "स्फोटक" |
चुलीवरील पाण्याला ठाऊक ऊर्जा त्यातील खरी "विधायक" |
ताप क्षमविता पाण्याचा जी स्वत:च हवेत विरूनी जाते | खळखळूनी...|| 2 ||
हिला कोंडूनी विरोध जितका जातो तिलाच तो "बळ" देऊन |
दबलेली शक्ती वाफेतील अडथळ्यास मग जाता ऊलथुन |
"अहं गिळा ह्या निखार्यातला " आवाहन पाण्याला करते | खळखळूनी…|| 3 ||
ईतरांचे चटके गिळण्याची तीव्र ओढ अंतरात भिनता |
बांधु शकेल कोणी त्याला ज्याच्या हृद्यी हि "व्यापकता" |
नगण्य "जीवन" मग थेंबातील विश्वच अवघे कवेत घेते |
खळखळूनी अपुल्यातुन मग हे "कलेवरागत" कसे गोठते ? || 4 ||
- मकरंद सुधाकर पाटोळे कदम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा