Translate

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

कर्मातील ऊर्जा


       // कर्मातील ऊर्जा \\


"भ्रष्ट" ताप आगीत चेतुनी देतो     "गुर्मी" तीज शक्तीची |

"अहंकार" का असा विसरतो ऊर्जा  "दबलेल्या कर्माची ?" ||धृ.||



अडकून पडता असहाय्य पाणी त्या भांड्याच्या सत्तेमध्ये |

"भ्रष्ट" आग जाळी भांड्याला मग "अस्थिरता" पाण्यामध्ये |

"घुसमट" भयाण ठरू पहाते अखेर जननी "नैराश्याची"| अहंकार ...||1||




"अशाश्वतीच्या" चक्रातून ह्या "भरडून" लाहि परमाणूंची |

"पेटत नाहि पाणी जळूनी" तीव्रताच रडता दु:खाची |

"आग क्षमवणे स्वभाव माझा" 'वाफ' आठवण देते ह्याची | अहंकार ...||2||




"तडफड पाहून  बंधनातली" मग आगीचे "कुत्सित" हास्य |

"अशाश्वतीच्या" विस्मरणाने "मुर्खपणाला" जरी त्या सौख्य |

वाफेचा तो "त्याग" सांगतो मने चेतवीन परमाणूंची |
अहंकार ...||3||



"चटक्यातुन" ह्या फुलुनी ऊर्जा पाण्यामधल्या परमाणूंची |

ऊलथुन अन्यायाचे बंधन जाता  "ऊकळी ऊद्वेगाची"|

दिसेल "विध्वंसक" आगीला "विधायक" एकी पाण्याची !

अहंकार का असा विसरतो ऊर्जा  दबलेल्या कर्माची ? ||4||


- मकरंद सुधाकर पाटोळे.












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा