Translate

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

श्रध्दा



                श्रध्दा

 ईवल्या  ज्योतीगत  का  विशाल  तार्यातील  तेजहि  लुकलुकते ?

दूर  किती  आपण  त्याच्याहून  की  ह्यातुन  हे  सांगत  असते ? || धृ. ||


व्यापकता  भक्तीतील  जखडून  राऊळातल्या  कुलुपामध्ये |

गुदमरती  श्रध्दा  पेटितुन  कुपोषणाच्या  मुलुखामध्ये |

श्रध्दा  सुमनांच्या  ओझ्याने  ग्रंथांमधले  सत्य  कोंडते | दूर ..||1 ||


अद्वैताच्या  गजरासंगे   ईथेच  नांदे  कशी  विषमता ?

हळवी  श्रध्दा  जर  हृद्यातील  कसा  दिन  कळवळे  भरडता ?

सद्विचार  अंधारी  हरवून  जयंतीच  संतांची  रडते |  दूर ...|| 2 ||



सृष्टीतील  सजीवांतुन  तळपुन   परमात्म्याचे  तेज  अखंडीत  |


दगडांच्या  मुर्तीमधुनी  दिसता  केवळ  जणू  होते  खंडीत  |


विवेक  बुडतो  अंधारी हे  परम  तेज  दिसुनी  लुकलुकते  |



दूर  किती  आपण  त्याच्याहून  की  ह्यातुन  हे  सांगत  असते ?   || 3 ||

-  मकरंद सुधाकर पाटोळे.















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा