Translate

मंगळवार, ९ एप्रिल, २०१९

भारत माझा मी भारताचा : रवि

भारत माझा मी भारताचा : रवि:              // रवि \\ "विधायक असते ती शक्ती" सत्य हेच सुर्यातुन दडले | ह्या तार्यांचे वंशज आपण ज्यातील ऊर्जेला हे कळले ||धृ...

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

"रामभरोसे"

..........// रामभरोसे \\…………

जीवन  ईथले  "रामभरोसे" चेहरा   ईथल्या  लोकशाहिचा |

निरोप  मज  देता  हिरमुसतो  का  चेहरा  माझ्या  आईचा ? || ध्रू. ||

करूनी  चाल  लाटांवर  मृत्यु  दडवून  चाहुल  दबकत  आला |

आधुनिक  शस्त्रांनी  विकसनशील  देशाला  बडवून  गेला |

मानवतेला  चिरडून  चेहरा  हसला  आतंकी  पशूतेचा ! निरोप .... || 1 ||

वीरमरण  जणू  अधिकार्यांचे  व्यवस्थेतल्या  चिंधड्या  दावून |

त्याच  व्यवस्थेवरी  विसंबुन  आशा  ऊठली  जरी  सावरून |

जीवनास  आत्ता  किंमत्त  का ?  प्रश्न  हाच  होता  आशेचा ! निरोप ... || 2 ||

जैसे  थे  परी  सुरक्षाच  ती  तशीच  हतबल  आधीसारखी |

ऊडदामाजी  काळे  कळण्या नजर  हवी  परी  रत्नपारखी |

प्रवेशद्वाराविना  स्थानके  जणू  मार्ग  ऊघडा  चोरांचा | निरोप ... || 3 ||

ऊद्गमदात्या  अवैध  वस्त्या  जरी  अनैतिक  त्या  धंद्यांच्या |

रूंदावत  होत्या  शहरांतुन   गिळूनी  पट्ट्या  भुखंडांच्या |

पाणी - घरपट्ट्या  भरूनीहि  नागरिक  दबुनी  देशाचा | निरोप ... || 4 ||

सरकारी  दाखले  मिळवण्या  सुरूच  खेटे  सामान्यांचे |

त्याच  दाखल्यांच्या  परी  हृद्यी  जणू  प्रेम  अवैध  वस्त्यांचे |

प्रश्न  मनी  मग  सुरक्षेस  का  " अजुनहि " चिरडून  भार  मतांचा ?  निरोप ... || 5 ||

होती  खिदळत  विकृतीच  ती  करूनी  हत्या  माणूसकीची |

वर्षे  सरली  कारण  तिजसाठी  खर्चत  माया  कोटिंची |

सुरक्षित  " विकृती "  ईथे  जणू  संदेशच  "अपुल्या"  वृत्तीचा | निरोप ... || 6 ||

खोट्या  पोकळ  व्यवस्थेस  ह्या  बसून  पुन्हा  आतंकी  दणका |

पडून  बळी  दुसर्या  शहरांतुन  ऊडून  तिथे  स्फोटांचा  भडका |

कुंभकर्णी  झोपेतुन  जाहला  घात  पुन्हा  मग  मुंबापुरीचा | निरोप ... || 7 ||

ओढ  घरांची  पावलांस  ज्या  शंका  नव्हती  किंचित  त्यांना |

त्यांच्या  निष्पापी  रक्ताची  आतंकी  हृद्यास  वासना |

मग  पाशवी  त्या  स्फोटांनी  श्वास  ऊखडला  मानवतेचा | निरोप ... || 8 ||

प्रत्येकाच्या  हृद्यस्थाला  धरले  हृद्यी  ज्या  शहराने |

शहरावर  त्या  पाहून  हमला  देश  गलबलून  आघाताने |

भ्रमणध्वनींचे  जाळे  हतबल  भार  झेलण्या  ह्या  चिंतेचा | निरोप ... || 9 ||

क्षेमकुशल  कळण्या  स्वकियांचे  मग  डोळ्यांतुन  प्राण  दाटले |

वृत्तवाहिन्यांवरी  विसंबुन  विश्वासाने  असता  सगळे |

वृत्तवाहिन्या  काहि  गेल्या  श्वास  कोंडूनी  विश्वासाचा |
निरोप ... || 10 ||

किंवा  योग्य  हे  असेल  कारण  नियम  आगळे  ह्या  देशाचे |

बळी  पाहूनी   स्वरूप  ठरते  सदैव  जिथल्या  आघाताचे |

स्फोट  घडविणे  अफवेमधुनी  असेल  धक्का  कुणा  यशाचा | निरोप ... || 11 ||

परी  स्फोटाने  युध्दभुमीची  दाहकता  पोळून  शहराला  |

रक्ताच्या  थारोळी  अवयव  कुठे  हरवूनी  ह्या  देहाला |

विधात्यास  मग  प्रश्न  चुकुन  का  " मी  निर्माता  सैतानाचा ? " निरोप ... || 12 ||

ईतरांना  सावरता  दिसली  परी  मानवता  जख्मी  होऊन |

ऊपचाराआधी  मृत्युची  झुंजच  निर्जीव  कोठे  विव्हळून |

हरूनी  रूग्णालयात  कोणी   "जन्म पोरक्या  परिवारांचा" ! निरोप ...|| 13 ||

हात  पोरका  फटित  मिळूनी  काळरात्रीच्या  दुसर्या  दिवशी |

पिळवटणार्या  प्रश्नांच्या  त्या  हृद्यावर  कोसळल्या  राशी |

धडपडेल  का  बाळच  कुठले  हात  न  दिसूनी  तो  मायेचा ? निरोप ... || 14 ||

लेक  लाडकी  होरपळून  का  हाताच्या  प्रेमळ  छत्राविण ?

माय - बाप  कोसळतील  थकूनी  कुठे  एकल्या  त्या  काठीवीण ?

एकच  ऊत्तर  दिसले  हतबल   "तिथे  हात  जो  सामान्याचा" | निरोप ... || 15 ||

राजकारण्यांना  देशातील  जो  जिवलग  मतदानापुरता |

त्या  हाताच्या  रेषांवर  जो  मृत्यु  का  मग  त्याच्यापुरता ?

येतो ?........ येतो  म्हणता  जिभ  धडपडे  निरोप  घेताना  घरच्यांचा |

निरोप  मज  देता  हिरमुसतो  का  चेहरा  माझ्या  आईचा ? || 16 ||

- मकरंद सुधाकर पाटोळे.

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

घड्याळ


....... // घड्याळ \\ …….
             

वेळ  सांगते  घड्याळ  की  ह्या  विश्वातील  सत्याचे  सार |

घड्याळात  पहाताना  करूया  आपण  ह्याचा  जरा  विचार  ||धृ.||


जणू  सत्याचे  भान  हरवूनी  चित्त  वेधण्या  ऊनाड  धडधड  |

पुढे  राहण्यासाठी  केवळ सुरूच  ज्याची  बाष्कळ  धडपड  |

सेकंद  काट्याच्या  वृत्तीचे  विवेकबुध्दीशी  जणू  वैर  |           घड्याळात … || 1 ||


ठाम  स्वत: जो  निर्धारावर  नसे  भय  त्याला  स्पर्धेचे  |

पाऊल  त्याचे  भान  देऊनी  जाते  विश्वाला  काळाचे  |

म्हणूनी  करते  जणू  बुध्दीहि  मिनिटाच्या  काट्याचा  आदर  | घड्याळात… || 2 ||


शर्यतीत  ह्या  मागे  जो  तो  अढळ  आपुल्या  ध्येय्यावरती  |

तार्यासम  तो  कारण  फिरते  विश्वची  अवघे  ह्याच्याभोवती  |

ठसा  ऊमटवून  जाते  अपुला  कोण  ह्यातले  मग  विश्वावर  ?

घड्याळात… || 3 ||


त्रिकोण  काट्यांचा  आवश्यक  तोल  साधण्यासी  काळाचा  |

हात  पकडण्या  ह्या  काळाचा  वारू  आवश्यक  प्रगतीचा  |

ऊधळून  घोडा  पण  मग  झाले  कोण  आज  कोणावर  स्वार  ?

घड्याळात  पहाताना  करूया  आपण  ह्याचा  जरा  विचार  || 4 ||


- मकरंद  सुधाकर  पाटोळे .

पडछाया


           // पडछाया \\


दडे घराच्या स्वप्नामागे 'काळी छाया'
का मृत्युची ?
कारण हि तर असते
किमया त्या 'सोयीच्या' अंधत्वाची ||
धृ.||
विस्तारत जाता जनसंख्या महानगरांतून
'स्वप्नांसोबत' |
गगनी भिडती ईमारती मग 'नियमांना'
भूमीवर चिरडत |
ईमारतींचे अरण्य हे कि पिढी 'ऊंच
झोपडपट्ट्यांची ?' | कारण...||1||
बांधकाम दर्जाची 'हत्या' होते 'लिंपून'
ईमारतींना |
ऊब सुरक्षित दिसुनी ह्यातून
परी त्या 'अजाण' निष्पाप्यांना |
'आयुष्याची मिळकत' देऊन करत
'खरेदी शवपेट्यांची'| कारण...||2||
डगमगल्या ना 'नियम' ठेचता अखेर
'भयकंपित' त्या दिवशी |
ईमारतींना कारण कळते गाठ आज
'धरणीकंपाशी' |
'गलितगात्र' ह्या ईमारती मग काढित
आठवण त्या 'नियमांची' |
कारण...||3||
जो तो बिथरून पाखरूच मग पाहून
'थरथरणारे घरटे' |
मृत्युमुखी टाकूनी पळाला 'तोल'
पाहूनी धडपड खुंटे |
'स्वप्नांची' सावलीच कळते
होती छाया 'अपमृत्युची' | कारण...||4||
रहिवाश्यांना दिसूनी भिंती 'दोन
भुजांगत अडकित्त्याच्या' |
आदळती ह्या भिंतींमधूनी 'मुर्त्या जिवंत
हतबलतेच्या' |
हृद्य भंगते आधी ज्यांचे पाहत 'पडझड'
हृद्यस्थांची | कारण...||5||
'पत्त्यांचे बंगले' कोसळता अखेर 'गाडून'
रहिवाश्यांना |
भाग्यवान का सुटले ह्यातून 'क्षणात'
गमवून जे प्राणांना ? |
जिथे 'वेदनाही' कळवळते पाहून घुसमट
ह्या श्वासांची | कारण...||6||
असहाय्य तळमळणारे कोणी भीक
मागता मग मृत्युची |
स्वत:च त्या 'मृत्युला'
हुंदका म्हणता 'धरा कास आशेची' |
जिथे पिळ
त्याच्या हृद्याला करा कल्पना मग
स्वकियांची | कारण...||7||
द्यामरण जो कुणास देतो कुणा श्वास
का गुदमरण्याला ? |
प्रशासनाच्या मदतीची जणू विलंब
होऊन आशा त्याला |
नंतरच्या धक्क्यांनी जाते चिरडून
आशा त्या मृत्युची | कारण...||8||
स्वकीयांच्याही हृद्यी आशा परी 'थरथरती'
स्वत: भयाने |
खोल हरवूनी डोळे त्यातील
पाणी 'विचलीत' ह्या प्रश्नाने |
ठरू ऊब ओघळताना की रेघ ठरू निर्द्य
चटक्याची ? | कारण...||9||
ढिगारेच मग उपसून निघते त्यातून
'आशा कुणा निराशा ' |
पुनर्जन्म तर कोठे तडफड कुणा गिळून
जाती दहा दिशा |
कुणा रेघ अश्रुंची 'पोळून' 'ऊब'
कुणा आनंदाश्रुंची | कारण...||10||
स्वार्थ आंधळा सुरुंगास
ह्या जरी रचुनी 'निर्माणावेळी' |
'भुकंपास' ठरवून आरोपी ठसवून 'एकच बाजू
काळी' |
'स्वार्थ' मोकळा पुन्हा घालण्या फुंकर
खोटी आपुलकीची | कारण...||11||
मदतीच्या हातालाही त्या जणू दृष्ट
त्या 'दुष्ट' प्रथेची |
बनवून 'याचक' ज्यात रडविते पिडीतांस
'छाया' आशेची |
जगलेल्यांचा 'जन्म' चिरडतो वाहत
'ओझी' ऊपचारांची |
कारण ही तर असते
किमया त्या 'सोयीच्या' अंधत्वाची ||
12||
- मकरंद सुधाकर पाटोळे .

नश्वरता



           // नश्वरता \\


सुर्य ऊगवतो अन मावळतो ठेवून साक्षी त्या क्षितीजाला |

कारण दोघे सदैव जाणून समृध्दीतील नश्वरतेला ||धृ.||



रंगमंच हा फुलतो ज्याचा त्या मेघांच्या कलाकृतीतून |

अभ्रांच्या कलशातील सागर कणाकणाला ज्याच्या भिजवून |

समृध्दीच्या डोहि तरीहि "अहंकार" नसतो गगनाला | कारण...||1||



भूमीच्याहि कवेत असतो विशाल रत्नाकर खळखळता |

समृध्दीचा थेंब थेंब तो परी "खार्या कर्जातुन" बुडता |

अशी कोरडी धरणी तरीहि नसे 'दिन' त्या आकाशाला | कारण...||2||



नसते खारेपण डोळ्यातुन "जीवनात" हरवूनी गोडवा |

समृध्दी अंबरात तरीहि भुमीच्या अंतरी  गारवा |

कारण "ना कुरवाळे" धरणी अवर्षणाच्या खोल व्रणाला | कारण...||3||



ऋतु वर्षेचा मग अवतरूनी चटक्यांवर त्या शीतल पाखर |

धरणी फुलुनी हिरवाईने गगनातील ऊडतो रत्नाकर |

"रिक्त" होऊनी "विरक्त" नभ जे शुष्कपणा ना जाळे त्याला | कारण...||4||



विशाल हृद्यी आकाशाच्या नसते मत्सर वृत्ती त्रोटक |

भुमी म्हणते रिक्त जरी हे जाणून मी नभ विशाल व्यापक |

"अलिप्त राहून हिंदोळ्यांवर" मिळे "स्थैर्य" नभ अन भुमीला | कारण...||5||



शांती हृद्यातील दोघांच्या श्वास पुरवूनी ऋतुचक्राला |

बरसुन जीवनधारा कोरून साकारत गेल्या सृष्टीला |

आज हि अर्वाचीन पाण्यातुन तेज नवे ह्या वसुंधरेला | कारण...||6||



खळखळते जे विश्वातुन अन धरून श्वास अपुल्या रक्तातुन

मळकट खारेपण सृष्टीतील पिऊनी कसे गोड ते जीवन ?

भूमी अंबर नाहि जखडून ठेवत कारण त्या पाण्याला |

कारण दोघे सदैव जाणून समृध्दीतील नश्वरतेला ||7||


- मकरंद सुधाकर पाटोळे.










कर्मातील ऊर्जा


       // कर्मातील ऊर्जा \\


"भ्रष्ट" ताप आगीत चेतुनी देतो     "गुर्मी" तीज शक्तीची |

"अहंकार" का असा विसरतो ऊर्जा  "दबलेल्या कर्माची ?" ||धृ.||



अडकून पडता असहाय्य पाणी त्या भांड्याच्या सत्तेमध्ये |

"भ्रष्ट" आग जाळी भांड्याला मग "अस्थिरता" पाण्यामध्ये |

"घुसमट" भयाण ठरू पहाते अखेर जननी "नैराश्याची"| अहंकार ...||1||




"अशाश्वतीच्या" चक्रातून ह्या "भरडून" लाहि परमाणूंची |

"पेटत नाहि पाणी जळूनी" तीव्रताच रडता दु:खाची |

"आग क्षमवणे स्वभाव माझा" 'वाफ' आठवण देते ह्याची | अहंकार ...||2||




"तडफड पाहून  बंधनातली" मग आगीचे "कुत्सित" हास्य |

"अशाश्वतीच्या" विस्मरणाने "मुर्खपणाला" जरी त्या सौख्य |

वाफेचा तो "त्याग" सांगतो मने चेतवीन परमाणूंची |
अहंकार ...||3||



"चटक्यातुन" ह्या फुलुनी ऊर्जा पाण्यामधल्या परमाणूंची |

ऊलथुन अन्यायाचे बंधन जाता  "ऊकळी ऊद्वेगाची"|

दिसेल "विध्वंसक" आगीला "विधायक" एकी पाण्याची !

अहंकार का असा विसरतो ऊर्जा  दबलेल्या कर्माची ? ||4||


- मकरंद सुधाकर पाटोळे.












रवि


             // रवि \\

"विधायक असते ती शक्ती" सत्य हेच सुर्यातुन दडले |

ह्या तार्यांचे वंशज आपण ज्यातील ऊर्जेला हे कळले ||धृ.||



दूर दूर विस्कटला असता हायड्रोजन ह्या ब्रम्हांडातुन |

"गुरूत्वीय बळ" झाले जागृत नवसृजनाची ओढ चेतवून |

विश्वाकरता बळ वायुच्या "अस्तित्वाला" जमवू लागले | ह्या ...||1||



फुलू लागले हे बळ वायु "एकत्रित" होण्याने अजुनी |

दडली ठिणगी त्या सृजनाची "एकसंधतेमध्ये" ऊमगुनी |

एकसंध करण्या मग त्याला अविरत बळ हे झटत राहिले | ह्या ...||2||



शर्थ प्रयत्नांची अन होळी होऊन कोट्यावधी वर्षांची |

धगधगणार्या वायुमधल्या अणूंस ना ईच्छा जुळण्याची |

"प्रतिकर्षण" विद्युतभाराचे कारण त्यांना रोखत गेले | ह्या ...||3||



किंवा अद्वैताने अपुल्या "ओळख" बदलू नये स्वत:ची |

परस्परांना दूर लोटणे म्हणूनी असे का चाल अणूंची ?

बने कोळसा की हिरा ऊत्तर "अणूसंरचनेतुन" दडले | ह्या ...||4||



अखेर धगधगत्या वायुतील ऊर्जा तो अंगार चेतवून |

"सीमोल्लंघन" वायुचे होऊन एकतेच्याच बळातून |

"परस्परांतुन स्वभाव मिटवू" जेंव्हा परमाणूंस वाटले | ह्या ...||5||



स्वत:स झोकून दिले अणूंनी परस्परांवर ऐक्याकरता |

"अद्वैतातुन"घडले नविन मुलद्रव्य ह्या विश्वाकरता |

"फ्युजन" म्हणूनी ह्या सृजनाला विज्ञानाने आज वंदिले | ह्या ...||6||



हायड्रोजनच्या अणूंपासूनी त्या  हिलीयमचे अणू घडूनी |

"वस्तुमान" ह्या नव्या अणूंचे किंचित मग "ऊर्जेत" बदलूनी |

"ईवल्या त्यागातुनी" ह्या अणू "अनंत ऊर्जा" फुलवून गेले | ह्या ...||7||



वायुच्या कोषातुन प्रकटे तारा किरणे गर्भी ज्याच्या |

किरणांचा हा प्रवास तेथुन ऊजळे राशी जो तिमीराच्या |

"माज न यावा पण तार्याला ह्या ऊर्जेचा" बळास कळले | ह्या ...||8||



"गुरूत्व बळ" हसले तार्यातील ऊर्जेशी साधुन "संतुलन" |

"विश्व बांधण्या" कटिबध्दच करूनी तार्याला त्या सृजनातुन |

मुलद्रव्य नवनविन घडवून विश्व प्रकाशित ज्याने केले | ह्या ...||9||



कोट्यावधी वर्षे हा "ध्यास" तेवूनी तार्याच्या गर्भाशी |

लोहतत्व बनले ज्यामधले अणू "न जुळूनी परस्परांशी" |

"अडखळूनी मग सृजनप्रक्रिया" ऊर्जेचे अवसानहि गळले | ह्या ...||10||



"ढासळते" संतुलन म्हणाले मग तार्याला "मिटव स्वत:ला" |

सज्ज जाहला करण्या विलीन मग तारा "स्वत:त अपुल्याला"|

"आहूतीविण सृजन रखडले पुढचे" की तार्याला कळले ? ह्या ...||11||



स्वगर्भातच स्वत:तल्या विश्वासह स्वत:स दिले झोकूनी |

"अस्तित्वच भरडूनी स्वत:चे"  महास्फोट घडविला त्यातूनी |

अनंत तार्यातील तेजाला तेज ईथे "हे" दिपवून गेले | ह्या ...||12||



विध्वंसक आघाती लहरी वाटे गिळतील ब्रम्हांडाला |

"सुपरनोव्हा" तो ठरला पण जो कारण "पुढच्या सृजनाला"|

धुळीस तार्याच्या स्फोटाच्या  रूपात ह्याने दूर विखुरले | ह्या ...||13||



मुलद्रव्य मग पुढची घडली "महास्फोटाच्या ह्या भट्टीतून" |

जीवसृष्टीला घडवण्यास आवश्यक ती तार्याला ऊमगून |

"विश्वनिर्मिती मृत्युतून माझ्या" जणू हे बलिदान म्हणाले | ह्या ...||14||



तार्यांची हि राखच कारण त्या सृजनाची बीज रूजवून |

तारा घडवून ज्या तत्वांना "त्यातून"   त्या मेघांना बनवून |

ज्या मेघांतून नवनविन ग्रह-तारे "त्यांच्या कुशीत" घडले | ह्या ...||15||



ह्याच "निरंतर" प्रक्रियेतूनी सौरमाला अपुली घडली |

सुर्याच्या ऊर्जेने वसुंधरेवर परी जी सृष्टी फुलली |

"तार्यांच्या बलिदानातुन घडलो  आपण" का  तिने जाणले ? | ह्या ...||16||



"अणू-रेणूतून ह्या सृष्टीतील गुणसुत्रच राखेचे ज्याच्या |

तो तारा मृत मायच अपुली आशा जगवून जी सृजनाच्या |

आईच्या पोकळीस रवीने बहिणीच्या मायेगत भरले |

ह्या तार्यांचे वंशज आपण ज्यातील ऊर्जेला हे कळले"||17||


- मकरंद सुधाकर पाटोळे.

















विकृती अन प्रकृती




     // विकृती अन प्रकृती \\

दोन अंश हे वसुंधरेचे
                रूप स्वार्थ अन ऊदारतेचे |

मुळे "सांधता" भुमातेसी
       प्रेम कुणाला का "शकलांचे ?" ||धृ.||



"स्तुती सुमनांच्या" हिमवृष्टीहून
                 वळवा पर्णरूपी हे कर्ण |

मानाचा हा भारच गिळेल तुम्हां
                    सांगतो जणू सुचिपर्ण |

अहंकार हा कारण मोडून जाईल
                    नकळत रोप यशाचे | मुळे ...||1||



समाजात ह्या "ऊतरण" तीव्र
               बीज रूजवता बंधुत्वाचे |

मुळेच "गुंफुन" समाजास मग
            नसेल भय "वाहून जाण्याचे"|

शिखरांवरचे वृक्ष पाजती
              जणू अमृत हे अनुभवाचे | मुळे …||2||



आतंकीत करणार्या लाटा
          दिसता गिळण्या ह्या देशाला |

निर्भयतेने भिडूनी त्यांना
          गिळाच त्यांच्या अस्तित्वाला |

खारफुटीची तळमळ सांगे
               जणू वार झेलत लाटांचे | मुळे …||3||



कुणी जळून कोरडे कुणाला
             खारट अनुभव रे दु:खाचा |

तुम्ही गोडवा द्या ईतरांना
          गिळूनी हुंदका परि अश्रूंचा |

झाड नारळाचे जणू सांगे
         ऊन्हात करपून अन खजुराचे |
मुळे …||4||


त्या आशेच्या ओलाव्यावीण
           जीर्ण तरूगत वाळून जीवन |

"तुझी प्रतिक्षा रे बहराला"
           जणू गुलमोहर सांगे बहरून |

"दूत अरे चटके दु:खाचे
               शीतल आशेच्या धारांचे"| मुळे …||5||



संजीवनरस  फळातूनी देते
               करूणा प्रेमळ झाडांची |

करूणेसव जणू "आशीर्वचने"
              अनंत अर्पुन हि बिजांची |

"रूजूनी" कल्पवृक्ष मग त्यातून
          अविचल पुतळे जे विनयाचे | मुळे …||6||



कडे "स्मृतींचे" वळूनी
       जपूनी ठेवे जणू प्रतिवर्षी ठेवा |

प्रेमळ आठवणी वर्षेच्या
             कधी जीर्ण दुष्काळी घावा |

"भविष्य" दावत त्या रेषांतुन
               जणू वृक्ष हे गतकाळाचे | मुळे …||6||



कर्ब जाळतो आज ऋतुंना
             ऊद्गम ज्याचा स्वार्थामध्ये |

वृक्ष गिळून ते कर्ब हलाहल
                   पानांतूनी स्वदेहामध्ये |

आमरणान्त जखडून त्याला
                  पांग फेडतो वसुंधरेचे | मुळे …||7||



गिळूनहि अपुल्या दुष्कर्माला
          बळी वृक्ष अपुल्या स्वार्थाला |

कुर्हाड ना वापरता मानव
              सोडे जंगलावर आगीला |

"अर्थ" साधुनी "वणव्याआडून"
            रचतो ईमले  जो "अर्थाचे" |

मुळे सांधता भूमातेसी
        प्रेम कुणाला का शकलांचे ? ||8||


-  मकरंद  सुधाकर  पाटोळे.




शंकाग्रस्त बीज


.......  शंकाग्रस्त बीज  .........


जीवनदायी "रक्षणकर्त्यांचा"  जर घातच "प्रघात" इथला |

 "ईतरांसाठी  विशाल होऊ का मी कवटाळून मृत्युला ?" || धृ. ||

क्षितीजाचेही नसते बंधन "शापित"  भूमी अथांग एैशी |

 "रक्त जळून"  छायेवीण जिकडे "सांगाड्यांच्या" अगणित राशी |

 अनंत वर्षे "शाप" भोगुनी फुटे पालवी त्या धरणीला | ईतरांसाठी...|| 1||



"करुणामयी" मग रोप ऊगवते "हिमालयाचे धैर्य" अंतरी |

 "वार"  झेलुनीही सृष्टीचे रोप पसरते "परोपकारी" |

विश्व पाहूनी तडफडणारे रोप घडविते वटवृक्षाला | ईतरांसाठी ...||2||



छाया ह्याची बनते घरकुल जणू श्वास हा प्रत्येकाचा |

 मरुभूमीतील तृष्णेसाठी जणू निर्झर हा चैतन्याचा |

 कल्पवृक्ष हा आनंदाचा का खुपतो मग त्या दैवाला ? | ईतरांसाठी...||3||



झंझावाती काळी छाया एके दिवशी नभास गिळूनी |

 कंपित होती दहादिशाही तिथे दामिनींच्या नृत्यानी |

 ढाल बनवूनी तरु 'स्वत:सी' धरतो ह्रद्यी प्रत्येकाला | ईतरांसाठी...||4||



"निर्भय"  ऊंच तरु हा पाहून "अहं"  ठेंगणा नभी विजेचा |

 नखशिखान्त पेटूनी दामिनी प्राण जाळूनी जाते ह्याचा |

 बीजही जळते जमिनीमध्ये प्रश्न विचारून हाचा स्वत:ला |

 "ईतरांसाठी विशाल होऊ का मी कवटाळून मृत्युला ?" ||5|| -




 मकरंद सुधाकर पाटोळे कदम.

परोपकारी


..........  परोपकारी !  ...........


पोट  स्वत:चे  भरता  वनस्पती  विश्वाला  जगवून  जाते |

भरल्यापोटि   मानवप्रगती  का  ईतरांचा  घास  ओढते  ?  || ध्रू .||



वसुंधरेच्या  हाती  ऊरती  माती  ज्याच्या  अस्तित्वावीण |

नावच  त्याचे  " जीवन "  कारण  अशक्य  हे  जीवन  पाण्यावीण |

प्राणवायुच्याशिवाय  पण  का  हे  पाणीहि  जीवन  ठरते  ?
| भरल्यापोटि ... || 1 ||



जसा  श्वास  हृद्याला  तशीच  ऊर्जा  आवश्यक  सृष्टीला |

सहस्त्र  किरणांतुनी  जरी  हा  रवी विखुरतो  ह्या  ऊर्जेला |

सृष्टीच  असती  जर  हाताविण  दान  तिच्या  का  हाती  ऊरते ?
| भरल्यापोटि ... || 2 ||



दिला  अर्थ  सुर्याला  अन  जणू  ह्या  पाण्याला  वनस्पतींनी |

सुर्याच्या  ऊर्जेला  सांधुन  पर्णरूपी  अनंत  हातांनी |

प्राणवायु  पाण्याचा  गुंता  त्या  हातांनी  हि  सोडवते |
भरल्यापोटि ... || 3 ||



मंथन  करते  जणू  पाण्याचे  रेणूंच्या  बंधास  ऊलगडून |

करूनी  मुक्त  मग  प्राणवायुला हायड्रोजनला  धरते  रोखुन |

कारण  स्फोटक  स्वभाव  त्याचा  वनस्पतीहि  जाणून  असते |
भरल्यापोटि ... || 4 ||



स्वभावसंसर्गाने  होईल  प्राणवायु  विध्वंसक  जाणून |

गिळूनी  हायड्रोजन  अन  शोषुन  कर्बवायुलाहि  सृष्टीतुन |

 विषास  गिळता  "वनस्पती" मग      श्वास  मोकळा  "सृष्टी" घेते |
भरल्यापोटि ... || 5 ||

अमृत  मिळते  " विषास  पचवून "  जणू  हे  वनस्पतीला  ऊमगुन |

गिळूंनी  वायुंना  ह्या  मिसळून  स्वभाव  त्यांचा  परस्परांतुन |

विषातुनी  " ऊर्जेचे  अमृत "  विश्वाकरता  हिच  घडवते |

भरल्यापोटि  मानवप्रगती  का  ईतरांचा  घास  ओढते  || 6 ||

- मकरंद सुधाकर पाटोळे कदम.






रामभरोसे


..........// रामभरोसे \\…………


जीवन  ईथले  "रामभरोसे" चेहरा   ईथल्या  लोकशाहिचा |

निरोप  मज  देता  हिरमुसतो  का  चेहरा  माझ्या  आईचा ? || ध्रू. ||



करूनी  चाल  लाटांवर  मृत्यु  दडवून  चाहुल  दबकत  आला |

आधुनिक  शस्त्रांनी  विकसनशील  देशाला  बडवून  गेला |

मानवतेला  चिरडून  चेहरा  हसला  आतंकी  पशूतेचा ! निरोप .... || 1 ||



वीरमरण  जणू  अधिकार्यांचे  व्यवस्थेतल्या  चिंधड्या  दावून |

त्याच  व्यवस्थेवरी  विसंबुन  आशा  ऊठली  जरी  सावरून |

जीवनास  आत्ता  किंमत्त  का ?  प्रश्न  हाच  होता  आशेचा ! निरोप ... || 2 ||



जैसे  थे  परी  सुरक्षाच  ती  तशीच  हतबल  आधीसारखी |

ऊडदामाजी  काळे  कळण्या नजर  हवी  परी  रत्नपारखी |

प्रवेशद्वाराविना  स्थानके  जणू  मार्ग  ऊघडा  चोरांचा | निरोप ... || 3 ||



ऊद्गमदात्या  अवैध  वस्त्या  जरी  अनैतिक  त्या  धंद्यांच्या |

रूंदावत  होत्या  शहरांतुन   गिळूनी  पट्ट्या  भुखंडांच्या |

पाणी - घरपट्ट्या  भरूनीहि  नागरिक  दबुनी  देशाचा | निरोप ... || 4 ||



सरकारी  दाखले  मिळवण्या  सुरूच  खेटे  सामान्यांचे |

त्याच  दाखल्यांच्या  परी  हृद्यी  जणू  प्रेम  अवैध  वस्त्यांचे |

प्रश्न  मनी  मग  सुरक्षेस  का  " अजुनहि " चिरडून  भार  मतांचा ?  निरोप ... || 5 ||



होती  खिदळत  विकृतीच  ती  करूनी  हत्या  माणूसकीची |

वर्षे  सरली  कारण  तिजसाठी  खर्चत  माया  कोटिंची |

सुरक्षित  " विकृती "  ईथे  जणू  संदेशच  "अपुल्या"  वृत्तीचा | निरोप ... || 6 ||



खोट्या  पोकळ  व्यवस्थेस  ह्या  बसून  पुन्हा  आतंकी  दणका |

पडून  बळी  दुसर्या  शहरांतुन  ऊडून  तिथे  स्फोटांचा  भडका |

कुंभकर्णी  झोपेतुन  जाहला  घात  पुन्हा  मग  मुंबापुरीचा | निरोप ... || 7 ||



ओढ  घरांची  पावलांस  ज्या  शंका  नव्हती  किंचित  त्यांना |

त्यांच्या  निष्पापी  रक्ताची  आतंकी  हृद्यास  वासना |

मग  पाशवी  त्या  स्फोटांनी  श्वास  ऊखडला  मानवतेचा | निरोप ... || 8 ||



प्रत्येकाच्या  हृद्यस्थाला  धरले  हृद्यी  ज्या  शहराने |

शहरावर  त्या  पाहून  हमला  देश  गलबलून  आघाताने |

भ्रमणध्वनींचे  जाळे  हतबल  भार  झेलण्या  ह्या  चिंतेचा | निरोप ... || 9 ||



क्षेमकुशल  कळण्या  स्वकियांचे  मग  डोळ्यांतुन  प्राण  दाटले |

वृत्तवाहिन्यांवरी  विसंबुन  विश्वासाने  असता  सगळे |

वृत्तवाहिन्या  काहि  गेल्या  श्वास  कोंडूनी  विश्वासाचा |
 निरोप ... || 10 ||



किंवा  योग्य  हे  असेल  कारण  नियम  आगळे  ह्या  देशाचे |

बळी  पाहूनी   स्वरूप  ठरते  सदैव  जिथल्या  आघाताचे |

स्फोट  घडविणे  अफवेमधुनी  असेल  धक्का  कुणा  यशाचा | निरोप ... || 11 ||



परी  स्फोटाने  युध्दभुमीची  दाहकता  पोळून  शहराला  |

रक्ताच्या  थारोळी  अवयव  कुठे  हरवूनी  ह्या  देहाला |

विधात्यास  मग  प्रश्न  चुकुन  का  " मी  निर्माता  सैतानाचा ? " निरोप ... || 12 ||



ईतरांना  सावरता  दिसली  परी  मानवता  जख्मी  होऊन |

ऊपचाराआधी  मृत्युची  झुंजच  निर्जीव  कोठे  विव्हळून |

हरूनी  रूग्णालयात  कोणी   "जन्म पोरक्या  परिवारांचा" ! निरोप ...|| 13 ||



हात  पोरका  फटित  मिळूनी  काळरात्रीच्या  दुसर्या  दिवशी |

पिळवटणार्या  प्रश्नांच्या  त्या  हृद्यावर  कोसळल्या  राशी |

धडपडेल  का  बाळच  कुठले  हात  न  दिसूनी  तो  मायेचा ? निरोप ... || 14 ||



लेक  लाडकी  होरपळून  का  हाताच्या  प्रेमळ  छत्राविण ?

माय - बाप  कोसळतील  थकूनी  कुठे  एकल्या  त्या  काठीवीण ?

एकच  ऊत्तर  दिसले  हतबल   "तिथे  हात  जो  सामान्याचा" | निरोप ... || 15 ||



राजकारण्यांना  देशातील  जो  जिवलग  मतदानापुरता |

त्या  हाताच्या  रेषांवर  जो  मृत्यु  का  मग  त्याच्यापुरता ?

येतो ?........ येतो  म्हणता  जिभ  धडपडे  निरोप  घेताना  घरच्यांचा |

निरोप  मज  देता  हिरमुसतो  का  चेहरा  माझ्या  आईचा ? || 16 ||



- मकरंद सुधाकर पाटोळे .

जीवन



                जीवन

भवतालीचे  चटके  शोषुन  "जीवनातली" शक्ती  फुलते |

खळखळूनी  अपुल्यातुन  मग  हे   "कलेगरागत"  कसे  गोठते ?||ध्रू.||



संवेदनाच  ह्याच्यामधुनी  सळसळूनी  अवघ्या  विश्वातुन |

अस्तित्वहि  नसते  सृष्टीचे  ज्याच्या  शीतल  स्पर्शावाचुन |

बाष्परूपे  गिळूनी  चटके  ते  तृष्णेच्या  वणव्यास  विझवते | खळखळूनी...|| 1 ||



बाष्पामधली  ऊर्जा  दिसते  "शीतल" अन  वाफेतील  "स्फोटक" |

चुलीवरील  पाण्याला  ठाऊक  ऊर्जा  त्यातील  खरी  "विधायक" |

ताप  क्षमविता  पाण्याचा जी  स्वत:च  हवेत  विरूनी  जाते | खळखळूनी...|| 2 ||



हिला  कोंडूनी  विरोध  जितका  जातो  तिलाच  तो  "बळ"  देऊन |

दबलेली  शक्ती  वाफेतील  अडथळ्यास  मग  जाता  ऊलथुन |

"अहं  गिळा  ह्या  निखार्यातला " आवाहन  पाण्याला  करते | खळखळूनी…|| 3 ||



ईतरांचे  चटके  गिळण्याची  तीव्र  ओढ  अंतरात  भिनता |

बांधु  शकेल  कोणी  त्याला  ज्याच्या  हृद्यी  हि  "व्यापकता" |

नगण्य  "जीवन"  मग  थेंबातील  विश्वच  अवघे  कवेत  घेते |

खळखळूनी  अपुल्यातुन  मग हे  "कलेवरागत"  कसे गोठते ? || 4 ||


- मकरंद सुधाकर पाटोळे कदम.







वैषम्याची छाया



          वैषम्याची  छाया



 सौंदर्याची किनार असते "सीमा" भीषण अंधकुपाची |


"माध्यम" युगात राहून जाणीव परि नाहि का ह्या सत्याची ? || धृ. ||




क्षितीजावर रंगांची धुळवड पहाट स्वप्नाला रंगवते |


अस्तित्वावीण "त्याच्या" परि जिकडे हि "तिचीच" होळी जळते |

तिथे स्वयं तेजाला खेटून असते सत्ता अंधाराची || "माध्यम" युगात || 1 ||




 सुर्याच्या तेजाला ईच्छा जरी अंधाराला गिळण्याची |


 प्रखर तेज धरण्या किरणांचे नसुन ओंजळी "त्या" हातांची |


 तेज रवीचे ईथे जाळते दिप्ती नेत्रातील ज्योतींची || "माध्यम" युगात || 2 ||




अंधकुपागत मिजास "येथे" दगडाच्या ईवल्या छायेला |


 पर्वत , गर्दवनांच्या कुशीत अभयदान परी त्या भुमीला |


तेज विखरूनी रवीचे जिकडे "हुळहुळ" "त्याच्या अस्तित्वाची" | "माध्यम" युगात || 3 ||




"जी" तेजाने न्हाऊन निघते तिचे अंग ते तेज पोळते |


 मगरमिठीतील तिमीराच्या भुमीचा "हिमयुग" श्वास कोंडते |


 ईथे ओढ नसते "त्याच्यावीण" विषमतेस ह्या समानतेची ||
 "माध्यम" युगात || 4 ||




"जळून - गोठणे" भुमीची जणू दिनचर्या त्या ऋतुचक्रावीण |


 नंदनवन "ती" आघातांचे त्याच्या मायेच्या "छत्राविण" |


झेलून अनंत आघातांना करी राख "जे" पाषाणांची || "माध्यम" युगात || 5 ||




ईवलीशी मग ऊल्का पाहते तुच्छपणाने ह्या भुमीला |


 "रान मोकळे" पाहून चढते बळ मग ऊल्केतील क्रौर्याला |


अनंत काळे डाग सांगती जणू कहाणी त्या "वारांची" || "माध्यम" युगात || 6 ||




 आघातांना पचवून आशा भुमीला तरी जणू "ऊद्याची" |


 नभी "शांतीचा" रंग भरे जो वाट पहाता त्या दिवसाची |


"रात ढळे ना परि गगनातील" नभात सत्ता जरी सुर्याची || "माध्यम" युगात || 7 ||




 "कर्करोग" झिरपे तेजातुन कुणा जाण का ह्या सत्याची ?


 संवेदनाच नसता येथे गर्दि "शोभेच्या" दगडांची |


कारण "चांद्रभुमी" हि नसते साथ जिला "वातावरणाची" |


"माध्यम" युगात राहून जाणीव परि नाहि का ह्या सत्याची ?



- मकरंद सुधाकर पाटोळे.